GRAMIN SEARCH BANNER

विधवा व एकल महिलांसाठी “मायेचं हक्काचं घर”; चक्रभेदी सोशल फौंडेशनचा उपक्रम

Gramin Varta
12 Views

देवरुख : समाजातील विधवा व एकल महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारी चक्रभेदी सोशल फौंडेशन आता या महिलांसाठी मोठा आधार बनत आहे. संस्थेच्या वतीने साडवली (देवरुख) येथे “मायेचं हक्काचं घर” या निवारा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. हा सोहळा ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत गंगाधर नगर, साडवली, जि. प. शाळेमागे, श्रमसाफल्य, शेट्ये यांच्या घरासमोर पार पडणार आहे.

चक्रभेदी सोशल फौंडेशन विधवा व एकल महिलांच्या सामाजिक सन्मानासाठी तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेने यापूर्वी २०२२ साली विधवा महिलांसाठी हळदीकुंकू हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमानंतर सरकारने विधवा महिलांवरील अन्यायकारक प्रथांबाबत निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संस्थेने घराघरात जाऊन अशा महिलांचे प्रश्न समजून घेतले असता अनेकांची दयनीय परिस्थिती उघड झाली.

या महिलांना माया, प्रेम आणि सुरक्षितता मिळावी, त्यांना समाजात मान-सन्मानाने जगता यावे यासाठी “मायेचं हक्काचं घर” ही संकल्पना वास्तवात आणण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी वैदेही सावंत (स्टेट मास्टर ट्रेनर, यशदा), वैदेही किर्वे, राजेंद्र वाडकर, कविता काजरेकर, योजना कदम, गुलनार पकाली, संपदा राणा यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Total Visitor Counter

2647815
Share This Article