लांजा : तालुक्यातील बेनीखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी खेरवसे गावचे सुपुत्र व लांजा तालुक्यातील समाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
बेनीखुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत येथे पार पडली. यावेळी बेनीखुर्द व खेरवसे या दोन्ही गावच्या महात्मा गांधी तटामुक्त समितीची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सभागृहातील सर्वानुमते लांजा तालुक्यातील समाजिक क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असलेले खेरवसे गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व विजय जाधव यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. विजय जाधव यांनी बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीचे गेली १५ वर्षे उपसरपंच पदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळला आहे. यासह समाजिक, शैक्षणिक व जनसुविधांबाबत अभ्यासू असणारे विजय जाधव यांची नागरिकांशी सलोख्याचे संबंध आहेत. बेनीखुर्द-खेरवसे गावांध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विजय जाधव यांची बेनीखुर्द-खेरवसे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड होताच अभिनंदन केले जाते आहे. ग्रामसभेला ग्रामसेवक व दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.