राजापूर : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वडदहसोळ शाळा क्र. २ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगायन, लेझीम व भाषण सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कावतकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची मागणी केली होती. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक श्री. संदीप विठ्ठल पळसमकर यांच्या माध्यमातून म.न.से. संपर्काध्यक्ष “आपला माणूस” श्री. भूषण अनंत विचारे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तरांची भेट दिली. त्यांचे वाटप स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात करण्यात आले.
तसेच शाळेसाठी साऊंड सिस्टीमची गरज व्यक्त झाल्यावर वडदहसोळ पळसमकरवाडीतील जुगादेवी नृत्य कलापथकाचे शक्तीवाले शाहीर श्री. सखाराम घाडयेबुवा आणि श्री. दीपक गोंडाळबुवा यांनी त्वरित ₹७,००० रोख रक्कम देऊन साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली.
या सहकार्याबद्दल मुख्याध्यापिका कावतकर मॅडम यांनी भूषण विचारे, सखाराम घाडयेबुवा आणि दीपक गोंडाळबुवा यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाला वाडीतील ग्रामस्थ श्री. बाबु राजाराम पळसमकर, केशव पळसमकर, डॉ. अनंत अर्जुन गोंडाळ, यशवंत पळसमकर, संदीप विठ्ठल पळसमकर, विश्वनाथ घाडये,संजय पळसमकर सौ.एश्वर्या घाडये, स्नेहल पळसमकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडदहसोळ शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांना दप्तर व शाळेला साऊंड सिस्टीम भेट
