GRAMIN SEARCH BANNER

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाटे पोलिस ठाणे हद्दीत जनजागृती उपक्रम

राजन लाड/जैतापूर: 26 जून 2025 रोजी “अंमली पदार्थ विरोधी दिन” निमित्त नाटे पोलिस ठाणे आणि रत्नागिरी जिल्हा व सागरी पोलिस स्टेशन यांच्या वतीने विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

या अंतर्गत, 24 जून 2025 रोजी सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत नाटे नगर विद्या मंदिर, नाटे येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस अंमलदार यांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अमली पदार्थांचे सेवन व त्याचे मानवी जीवनावरील परिणाम यावर माहिती देण्यात आली.

25 जून 2025 रोजी सायंकाळी 16.00 ते 16.30 या वेळेत, न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथील विद्यार्थ्यांना याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर 26 जून 2025 रोजी, साने गुरुजी हायस्कूल आणि कॉलेज, जानशी येथील विद्यार्थ्यांनाही अमली पदार्थांपासून होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी रत्नागिरी जिल्हा व सागरी पोलीस स्टेशन, नाटे यांच्या वतीने सखोल माहिती देण्यात आली.

या सर्व उपक्रमांचा उद्देश म्हणजे तरुण पिढीमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना व्यसनमुक्त आरोग्यदायी आयुष्याची दिशा दाखवणे, आणि समाजामध्ये सकारात्मक संदेश पसरवणे हा होता.
या उपक्रमांचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाणे नाटेचे पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

Total Visitor Counter

2475015
Share This Article