संगमेश्वर : एस.टी.संगे पर्यटन या योजनेअंतर्गत साखरपा पंचक्रोशीतील मारुती भक्तांनी अकरा मारुतींचे दर्शन घेतले.
कोल्हापूर, सांगली ,सातारा या तीन जिल्ह्यातील श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित दासमारुती चाफळ, प्रताप मारुती चाफळ, प्रताप मारुती उंब्रज, गोंडस मारुती पारगाव, विशाल मारुती मनपाडळे, वीर मारुती माजगाव, सुंदर मारुती मसूर, वीर मारुती शहापूर, भव्य मारुती बत्तीस शिराळा, खडीचा मारुती शिंगणवाडी, बहेचा मारुती या मारुतींचे दर्शन घेऊन अकरा मारुती दर्शनाचा संकल्प पूर्ण केला.
साखरपा, कोंडगाव, पुर्ये तर्फे देवळे, देवडे, देवरूख येथील मारुती भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
या प्रवासादरम्यान चालक पी. पी. कदम, वाहक आर. जे. यांनी मार्गदर्शन करून चांगली सेवा दिली. देवरूख येथील एस.टी.प्रेमी योगेश फाटक यांनी देवरूख येथील योग्य प्रकारे नियोजन केले. तसेच साखरपा येथून एस.टी. चालक गणेश वायदंडे यांनी योग्य नियोजन करून हा दर्शन सोहळा यशस्वी केला.
एस.टी.संगे पर्यटन या देवरूख आगाराच्या योजनेमुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्याचा योग येत असल्यामुळे त्यांनी धन्यवाद दिले आहेत. साखरपा पंचक्रोशीतून आतापर्यंत सहा वेळा धार्मिक स्थळांना भेटीच्या सहली आयोजित करण्यात आल्या.
साखरपावासीयांकडून श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती दर्शन यात्रा
