संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर (४०) जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धामापूर गावचे सुपुत्र आणि जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशील भायजे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांचे निवडणूक लढवणे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. सुशील भायजे हे संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे अत्यंत खंदे समर्थक आणि निकटवर्तीय समजले जातात.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांना धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून निर्णायक मताधिक्य मिळाले होते, ज्यामुळे त्यांचा विजय अधिक सुकर झाला होता. हे मताधिक्य मिळवून देण्यात सुशील भायजे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. यामुळेच या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे विधानसभेच्या वेळी दिसून आले होते.
सुशील भायजे यांच्या समवेत राष्ट्रवादी पक्षाचे एक मोठे कार्यकर्ते मंडळ कार्यरत आहे, ज्यात शेखर उकार्डे, शशिकांत घाणेकर, सुरेश कांगणे, महेश बाष्टे, सुबोध चव्हाण, अजय चांदीवडे, गणपत चव्हाण, श्रीमती अंकिता चव्हाण, अक्षय चव्हाण, सुरेश घडशी (मुंबई संपर्क प्रमुख), संतोष गोटेकर, दीपक जाधव, रुपेश गोताड, लहू सुर्वे, तुकाराम मेस्त्री, उमेश महाडिक, दत्ताराम भायजे, सुरेश रामणे, सिद्धार्थ पवार, वैभव मते, कृष्णा जोगळे, दीपक शिगवण, जाकीर भाई, निलेश भुवड, भाई किंजळकर, समीर लोटणकर यांचा समावेश आहे.
सुशील भायजे यांचा जनसंपर्क खूप मोठा आणि तगडा असल्याने, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटात अनेक विकासकामे यशस्वीरित्या मार्गी लावली असून, त्यांनी वैयक्तिक कामांवरही विशेष लक्ष दिले आहे.
पुढील काळात राज्याच्या राजकारणात युती म्हणून लढताना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.