GRAMIN SEARCH BANNER

दापोली : लिफ्ट तुटून महिलेचा मृत्यू, मालकासह ऑपरेटरवर गुन्हा

दापोली : लिफ्ट तुटून मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने काजू फॅक्टरीचे मालक व ऑपरेटरविरोधात दापोली पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ मार्च रोजी घडला होता.

तक्रारदार प्रभाकर कासेकर (वय ५९ रा.- ओळगाव, विजय शंकरवाडी) यांची पत्नी प्रविणी प्रभाकर कासेकर या वळणे एमआयडीसीत पाच वर्षांपासून कोकण फळ प्रक्रिया संस्थेत काम करीत होत्या. २ मार्चला प्रविणी या सकाळी कंपनीच्या गाडीतून कामाला गेल्या. काजू फॅक्टरीत काम करताना बार तुटून लिफ्ट प्रविणी यांच्या अंगावर पडली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला जखमा झाल्या. कारखान्याचे  मालक धनंजय यादव यांनी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तसेच चैन पुली पाळणा यांची नियमित तपासणी केली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चैन पुली पाळण्यावर ऑपरेटर प्रणय पवार याने क्षमतेपेक्षा जास्त काजू बी भरलेली होती. त्यामुळे चेन पुली पाळणा तुटून प्रविणी यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. प्रवीणी यांच्या मृत्यूला कारखान्याचे व्यवस्थापक धनंजय लक्ष्मणराव यादव (रा. वळणे एमआयडीसी, ता. दापोली) आणि ऑपरेटर प्रणय प्रकाश पवार (रा. मौजे दापोली, ता. दापोली) हे कारणीभूत आहेत अशी तक्रार प्रविणी यांचे पती प्रभाकर कासेकर यांनी सोमवारी (ता. १५) दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Total Visitor Counter

2455997
Share This Article