GRAMIN SEARCH BANNER

भोस्ते घाटात पहाटे भीषण अपघात; इर्टिगा कार संरक्षक भिंतीवर आदळून चालक जखमी

Gramin Varta
234 Views

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाट परिसरात रविवारी पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेली इर्टिगा कार चालकाच्या ताब्यातून सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत असलेल्या जखमी चालकास बाहेर काढून प्राथमिक मदत दिली व तत्काळ उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

प्राथमिक तपासानुसार, भोस्ते घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. पहाटेच्या वेळेस रस्त्यावर धुके आणि कमी प्रकाश असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भोस्ते घाट परिसरात वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी व विशेषतः पहाटेच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3370003
Share This Article