GRAMIN SEARCH BANNER

भाजपा रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चाच्यावतीने उद्या रक्तदान शिबीर

Gramin Varta
80 Views

रत्नागिरी : भाजपा नेते, भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा रत्नागिरी दक्षिण युवा मोर्चा आयोजित रक्तदान शिबिर उद्या  १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी येथे आयोजित केले आहे.

या शिबीराला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रत्नागिरीतील रक्तदाते यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3379032
Share This Article