GRAMIN SEARCH BANNER

खेड : कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Gramin Varta
98 Views

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई एंटरप्रायझेससमोर गुरुवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शंकर भिमराव भोसले (वय ४०, रा. तिसंगी, ता. खेड) हे जखमी झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी तत्काळ मदत करत जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कार चालक (एम.एच. ४७ बीबी ८२४७) हा मुंबईहून खेडकडे येत असताना त्याच्या कारने पुढे जाणाऱ्या दुचाकीला (एम.एच. ०८ बीडी ३१०२) पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Total Visitor Counter

3369379
Share This Article