GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडून वाढीव २०% चे  आदेश जारी

Gramin Varta
41 Views

मकरंद सुर्वे / संगमेश्वर

    महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना वाढीव २०% अनुदान घोषित केले आहे.राज्यशासनाने या संबधीचा शासन निर्णय २५ ऑगस्ट २०२५  रोजी जारी केला.राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळांना १ ऑगस्ट पासून वाढीव २०% वेतन अनुदान दिले जाईल असे शासन निर्णयात नमूद केले आहे.व त्यासाठी लागणारा निधी देखील शासनाने मंजूर केला आहे.

२५ ऑगस्ट २०२५. रोजी च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही होण्यासाठी राज्यातील उपसंचालक,शिक्षणाधिकारी यांना २९ ऑगस्ट रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी पत्र काढले.

शासन निर्णयाची,व शिक्षण संचालक पुणे यांच्या आदेशाची कोल्हापूर विभागात उपसंचालक महेश चोथे यांनी तात्काळ कार्यवाही सुरु करत कोल्हापूर विभागात,कोल्हापूर सह सांगली,सातारा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २०% वरून ४०% वेतन अनुदानासाठी,व ४०% वरून ६०% वेतन अनुदानासा साठी पात्र ठरत असलेल्या अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे.यामध्ये २०%  वरून ४०%  अनुदानासाठी पात्र ठरलेली १५६ कनिष्ठ महाविद्यालयांच्या वाढीव तुकड्या व शाखा असून यामध्ये ६४४ पूर्णवेळ,२५८ अर्धवेळ,५११ तासिका तत्वावर ,४४प्रयोग शाळा सहाय्यक पदांना तर ४०% वरून ६०% अनुदानास पात्र ठरलेल्या ८८ कनिष्ठ महाविद्यालयांच्या वाढीव तुकड्या व शाखांचा समावेश आहे.यामध्ये ४०६ पूर्णवेळ,१२० अर्धवेळ,३३३ तासिका तत्वावर,२८ प्रयोग शाळा सहाय्यक पदांना अनुदान मंजूर झाले आहे.
  वाढीव २०% अनुदान घेणाऱ्या अंशतः अनुदानित उच्च शाळांची तपासणी करून याद्या घाोषित करण्याच्या कामी कोल्हापूर  विभाग पुन्हा अव्वल ठरला आहे.

कोल्हापूर उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण उपसंचालक स्मिता गौंड,हणमंत बिराजदार,महेश सावंत,लक्ष्मण पवार,नवनाथ लोखंडे या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

पाचही जिल्ह्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अचूक सादर करण्यासाठी संघटनेच्या प्रा रत्नाकर माळी,प्रा चंद्रकांत बागणे,प्रा जयसिंग जाधव,प्रा भारत शिरगांवकर,प्रा पानारी, प्रा   राहुल यादव,प्रा प्रशांत मेश्राम,प्रा अभिजित सुर्वे,प्रा अमोल धुलप,प्रा समृद्धी भुवड,अभिजित सहस्त्रबुद्धे,नितीन जाधव आदिनी मेहनत घेतली. विशेषतः वाढीव २०% अनुदानाचा लाभ अंशतः अनुदानित शिक्षकांना  मिळण्यासाठी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शासन दरबारी जोरदार आवाज उठवला.व पाठपुराव्याला यश आले.

कोल्हापूर विभागातील वाढीव २०% साठी कनिष्ठ महाविद्यालये घोषित झाल्याने दिवाळीच्या आधीचा होणारा सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर पगार हा वाढीव् २०% नी होणार का हा प्रश्न शिक्षक वर्गात घोंगावत आहे.त्यासाठी शिक्षक आमदार प्रयत्न करत आहेत.वाढीव २०% ने बिले वेतन पथकाला पाठवण्यासाठी, शिक्षण आयुक्त व संचालक कार्यालय पुणे यांचे आदेश वेतन पथकाला मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. हे आदेश येत्या २ दिवसात वेतन पथकाला मिळाले तर कोल्हापूर विभागातील या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची दिवाळी गोड जाईल हे निश्चित.

Total Visitor Counter

3199318
Share This Article