25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने हळहळ
खेड : तालुकातील सवेणी, वळणवाडी येथे एका तरुणाने नर्सरीतून व्हिडिओ काल करून बायकोला एक गोळी खात असल्याचे दाखवले. त्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला आणि मुलाला मिठी मारून नंतर खाली पडला तो उठलाच नाही. 25 वर्षाच्या आकस्मिक मृत्यूने पत्नी आणि मुलगा जागीच हळहळले. अचानक काय झालं याचं काहीच कळलं नाही. तो दोघांनाही सोडून गेला. ही घटना ०५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडली. कृष्णा एकनाथ पवार (२५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्याच्या पत्नीने खेड पोलिस ठाण्यात दिली.
त्याच्या पत्नीने सांगितले की, कृष्णाने झाडांच्या नर्सरीमधून मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तिला हातात कसलीतरी पांढऱ्या रंगाची गोळी दाखवली आणि कॉल कट करून तो घरी आला. घरी आल्यानंतर पत्नीने त्याला त्या गोळीबद्दल विचारले असता, त्याने रागाने ‘तुला काय करायचे आहे’ असे उत्तर दिले. त्यानंतर तिघेही चहा प्यायले. यावेळी कृष्णाने मुलाला आणि पत्नीला जवळ घेतले आणि ‘आता मला जगायचे नाही’ असे बोलून तो चक्कर येऊन जमिनीवर पडला. पत्नीला वाटले की त्याने कदाचित व्हिडिओ कॉलवर दाखवलेली पांढऱ्या रंगाची गोळी खाल्ली असावी. तिने त्याला मिठाचे पाणी दिले, परंतु त्याला उलटी न झाल्याने, अस्वस्थ झालेले पाहून तिने मामाला फोन करून बोलावले. त्यांनी गावातील रिक्षा बोलावून कृष्णाला उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नर्सरीतून व्हिडिओ कॉल करून बायकोजवळ बोलला, घरी येऊन मुलाला मिठी मारली अन् जमिनीवर कोसळला

Leave a Comment