माथेरान : फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या एर्टिका कारला रविवारी भीषण अपघात घडला. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दैव बलवत्तर म्हणून यातील सात प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
घाटातील पीटकर पॉईंट येथील अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याची सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस म्हणजेच रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये हेलकावे खात अडकून राहिली. त्यामुळे सर्व पर्यटक सुखरूप बचावल्याने पर्यटकांनी सुटकेचा श्वास घेतला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
रविवारी सुट्टी असल्याने ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथील राहण ारा वाहन चालक सुरज येसले हा देखील परिसरातील सहा पर्यटकांना आपल्या वाहन एर्टिका कारमधून भाडे म्हणून घेऊन आला होता. सकाळी सुरज हा माथेरान घाट चढण्यासाठी म्हणून नेरळ येथून सुरुवात केली होती.
साडे दहा वाजण्याच्या सुमारास वॉटर पाईप या रेल्वे स्थानकाच्या जवळील असलेल्या पिटकर या अवघड वळ णावर घाट चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. एकीकडे घाटात वाहनांची तर दुसरीकडे पर्यटकांची गर्दी होती. रविवार सुट्टी असल्याने ही गर्दी दिसून येत होती.
दरम्यान सूरजला घाटात समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्याने आपल्या कारची स्टेरिंग गोल फिरवली असता कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस अर्धवट अडकून पडली. दैवबळवत्तर म्हणून कार खोल दरीच्या बाजूला न पडता कार रस्ता आणि खोल दरीच्या मध्येच अर्धवट अवस्थेत हवेत हेलकावे खात अडकली.
अपघात लक्षात घेता स्थानिक वाहन चालकांनी अपघातग्रस्त वाहनातील पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी आपण थोडक्यात बचावले म्हणून पर्यटकांनी मोकळा श्वास घेतला अन्यथा ही कार खोल दरीत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
वाहतूककोंडीची समस्या कायम
विकेंड सुट्टी असल्याने माथेरान येथे नेहमी प्रमाणे घाटात वाहनांची लांबच लांब रांग लागून वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटणार कधी असा प्रश्न समोर आला. त्यातच नवख्या येणाऱ्या वाहन चालकांना मात्र घाटातील अवघड वळणाचा अंदाज येत नसल्याने येथे अपघात घडत आहेत.
या आधी देखील याच ठिकाणी चार वाहने खोल दरीत कोसळत असताना सुरक्षा कठड्यावर अडकून राहिलेले आहे. एमएमआरडीए आणि स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून आणखी मजबूत सुरक्षा रेलिंग बांधणे गरजेचे आहे.
माथेरान घाटात सुरक्षा रेलींग तोडून कार खोल दरीत

Leave a Comment