मुंबई: महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजपा-महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे आहे.
शासनाच्या वतीने पूरग्रस्तांचे मदत व पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. भाजपा कार्यकर्ते देखील प्रशासनाला सहकार्य करत आहेत. या कामाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व भाजपा खासदार व आमदार एकजुटीने पुढे सरसावले आहेत. यासाठी खासदार व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. पूरग्रस्तांचे जीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थनाही केली आहे.