GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा फोटो असोसिएशन वतीने सिनेमॅटिक वर मोफत कार्यशाळा

Gramin Varta
6 Views

रत्नागिरी: जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन वतीने वेळोवेळी विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. अल्पावधीतच जिल्हा संघटनेने  500 पेक्षा जास्त मोफत कार्यशाळा तसेच दोनशेहून अधिक वेबिनारचे आयोजन केलेले आहे. अशाच पद्धतीने रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या वतीने सन आर्ट स्टुडिओ  सारडा ग्रुप सांगली आणि सोनी इंडिया कंपनी यांच्या सहकार्याने सिनेमॅटिक या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले आहे. या कार्यशाळासाठी प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर माननीय अरुण कुमार सर तसेच प्रोस्पेशालिस्ट माननीय सुनील गवळी सर सोनी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेमध्ये सोनी कंपनीचे नवीन कॅमेरे याबद्दल अधिक माहिती आणि सोबत सिनेमॅटिक बाबत नवीन ट्रिक्स आणि टेक्निक्स मॉडेल सोबत घेऊन प्रात्यक्षिक सहीत दाखवण्यात येणार आहेत.

जिल्हा असो.वतीने आयोजलेली ही कार्यशाळा गुरुवार दिनांक 31 जुलै2025 रोजी चिपळूण तालुका असोशियन ला सोबत घेऊन सकाळी 10 ते 5 या वेळेत चिपळूण वालोपे येथील हॉटेल रिम्झ येथे होणार आहे तर दिनांक 1 ऑगस्ट2025 रोजी हीच कार्यशाळा रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशन ला सोबत घेऊन रत्नागिरी मांडवी येथील हॉटेल सी फॅन येथे सकाळी 10ते 5 या वेळामध्ये होणार आहे.     

मर्यादित छायाचित्रकारासाठी ही कार्यशाळा असल्याने नाव नोंदणी आवश्यक असणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यावसायिक फोटोग्राफर बंधूनी त्वरित नाव नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारच्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेण्यासाठी व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या संलग्न तालुका असोसिएशनचे सभासदत्व त्वरित घ्यावे असे आवाहनही रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा व व संलग्न तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Total Visitor Counter

2652218
Share This Article