GRAMIN SEARCH BANNER

देवरुखमधील सप्तलिंगी नदीत बुडणाऱ्या दोघांना जीवदान

Gramin Varta
32 Views

:- शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडत असताना वाचवण्यात आले. तरुणाच्या सहकाऱ्यांनी धाडसाने दोघांना वाचवले, ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. दोन्ही तरुणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर परिसरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्राच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये विसर्जन होत असते. विसर्जन केलेले गणपती झाडाझुडपांमध्ये कडेला अडकलेले असतात. हे गणपती दुसऱ्या दिवशी खालच्याआळी येथील तरुण एकत्र येऊन पुन्हा पाण्यात विसर्जन करण्याचे काम करतात.

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खालची आळी येथील तरुण नदीपात्रात उतरून अडकलेले जाळीतील गणपती सोडवण्याचे काम करत होते. एवढ्यातच पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे आशय बारटक्के हा तरुण पट्टीचा पोहणारा असतानाही पाण्यात बुडू लागला.त्याच्या सोबत आणखी एक तरुण बुडू लागला.

हे लक्षात येताच तात्काळ सहकाऱ्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत. दोघांनाही देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

या दोघांचे प्राण वाचल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या घटनेबाबतची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.

Total Visitor Counter

3372445
Share This Article