GRAMIN SEARCH BANNER

दापोली : विकलेल्या जागेचे पैसे न दिल्याने आत्महत्या केल्याप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

Gramin Varta
95 Views

दापोली : हर्णे–राजवाडी (ता. दापोली) येथील जयंत दुबळे (वय 80) या वृद्धाने जागा विक्रीचे 40 लाख रुपये न मिळाल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास जयंत दुबळे हे आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे समजताच अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, पुढील तपासादरम्यान पोलिसांना मृताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी संदेश कदम आणि अमोल गुरव या दोघांनी जागेच्या विक्रीतील उर्वरित 40 लाख रुपये दिले नाहीत, त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना होऊन आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.

या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

Total Visitor Counter

3206546
Share This Article