GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; खोपोलीजवळ २० गाड्यांची धडक

Gramin Varta
24 Views

खोपोली:  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी एक मोठा अपघात घडला. खोपोली परिसरात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने जवळपास 15 ते 20 वाहनांना धडक बसली. हा अपघात नवीन बोगदा ते फूडमॉल हॉटेल दरम्यान घडला.

सदर कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने अनेक चारचाकी आणि मालवाहू वाहनांवर जोरदार धडक दिली. काही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली आहेत. अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, घटनास्थळी पोलिस आणि मदत पथक दाखल झाले आहे.

सुदैवाने, या भीषण अपघातात जीवितहानी टळली आहे, मात्र अनेक प्रवासी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमांमुळे उपचार घेत आहेत.

Total Visitor Counter

3388322
Share This Article