GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये जुन्या वादातून दोघांना बांबूने बेदम मारहाण; एकावर गुन्हा

चिपळूण: शहरातील वालोपे भोजवाडी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका वेल्डरला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी केतन प्रकाश भोसले (रा. वालोपे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मतेवाडी परिसरात राहणारे प्रमोद महादेव जाधव हे ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपली ओळखीची महिला स्वरा मोहिते हिच्या घरी चायनीजचे पार्सल देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी केतन भोसले याने फिर्यादी जाधव हे संबंधित महिलेला नेहमी मदत का करतात, याचा राग मनात धरून त्यांच्यावर पाठीमागून हल्ला चढवला.

आरोपीने सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने प्रमोद जाधव यांच्या मानेवर, खांद्यावर आणि पायावर जोरदार प्रहार करून त्यांना जखमी केले. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी स्वरा मोहिते मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता, आरोपीने त्यांनाही बांबूने मारहाण करून दुखापत केली. या हल्ल्यामागे आरोपी आणि संबंधित महिला यांच्यातील जुना कायदेशीर वाद कारणीभूत असल्याचे समजते. या घटनेनंतर प्रमोद जाधव यांनी १२ एप्रिल रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१) नुसार गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3486465
Share This Article