खेड: शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलेल्या एका वक्तव्याचा खेड शहर शिवसेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. अनिल परब यांचे वक्तव्य ‘अशोभनीय’ असल्याची भावना व्यक्त करत खेड शहरातील शिवसैनिकांनी तीनबत्ती नाका येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करत त्यांचा जाहीर निषेध केला.
अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खेड शहरातील शिवसैनिकांमध्ये आणि पक्ष नेतृत्वामध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींच्या मते, परब यांचे वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला आणि राजकीय सभ्यतेला धरून नाही.
या निषेध आंदोलनात खेड शहराचे अनेक धडाडीचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अनिल परब यांच्या वक्तव्याबद्दल आपला संताप व्यक्त केला. विशेषतः, तीनबत्ती नाक्यावर कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मकरीत्या ‘जोडे मारो’ आंदोलन करून आपला निषेध नोंदवला.