राजापूर : तालुक्यातील तेरवण येथील बायंगवाडी येथे मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका २७ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयश्री हरी जुवळे (वय २७) ही मनोरुग्णालयात उपचार घेत होती. तिला मानसिक आजाराचा त्रास होता आणि तिची औषधेही सुरू होती. २० ऑगस्ट रोजी दुपारी ती घरी एकटीच असताना, तिने घरात ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले.
जयश्रीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजापूरमध्ये 27 वर्षीय तरुणीची आत्महत्या
