GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत विश्वासघाताने मोबाईल आणि दुचाकी लंपास; बँक खात्यातून ३३ हजार काढले

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील एकता नगर, खेडशी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीचा विश्वासघात करून त्याच्या खोलीतील सहकाऱ्याने त्याचा मोबाईल, मोटारसायकल आणि बँकेतील ३३ हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाले आहे. ही घटना २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुनाथ कृष्णा कळंगुटकर यांच्या एकता नगर, खेडशी येथील घरात दीपक चंपालाल चौधरी (वय ३३, मूळ रा. बलरामपूर, मध्यप्रदेश) हे भाड्याने राहत होते. त्यांच्यासोबत अक्रम शेख (रा. पनवेल) नावाचा एक इसमही राहत होता. याच अक्रम शेखने दीपक चौधरी यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांचा टेक्नो कंपनीचा मोबाईल आणि टी.व्ही.एस. कंपनीची स्पोर्ट मोटारसायकल (क्र. एम.एच.०८.य.२८३१) घेऊन पोबारा केला.

विशेष म्हणजे, आरोपी अक्रम शेख इथेच थांबला नाही. त्याने दीपक चौधरी यांच्या मोबाईलचा वापर करून त्यांच्या ए.यू. बँकेच्या खात्यातून ३३,००० रुपये स्वतःसाठी काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१६ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी अक्रम शेखचा शोध सुरू आहे.

- Advertisement -
Ad image

Total Visitor

0217882
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *