राजापूर : तालुक्यातील नाटे बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे २६ लाख ५९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ही आग धाऊलवल्ली येथील राजेश पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीत लागली. मध्यरात्री अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण इमारतीतील सात दुकाने भस्मसात झाली. घटनेनंतर पोलीस, महसूल आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, शॉर्टसर्किट हा संभाव्य कारण म्हणून पुढे आला आहे.
प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, एकूण २६,५९,४५५ रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
◼️इमारतीचे बांधकाम – ₹८,५०,०००
◼️प्रसाद पाखरे (फोटो स्टुडिओ) – ₹४,१७,०००
◼️केदार ठाकूर (कापड व प्लास्टिक वस्तू दुकान) – ₹३,३५,०००
◼️विनोद शेलार (चायनीज सेंटर) – ₹२,५५,०००
◼️प्रदीप मयेकर (टेलरिंग शॉप) – ₹१,३६,४००
◼️निकिता गोसावी (ब्युटी पार्लर) – ₹१,१३,७००
◼️नारायण गोसावी (कटलरी दुकान) – ₹८,९७,३५५
◼️दिगंबर गिजम (उपहारगृह) – ₹५२,०००
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असून, पूरक मदतीसाठी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाटेत ७ दुकानांना लागलेल्या भीषण आगीत २६ लाखांचे नुकसान
