GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या कापसाळ परिसरात शिरली आठ फुटी मगर; वनविभागाकडून सुरक्षित रेस्क्यू

चिपळूण:  तालुक्यातील कापसाळ-फणसवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री लोकवस्तीत एक महाकाय मगर शिरल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, लोकवस्तीत मगर आल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ नागेश कांबळी यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये वनपाल एस. एस. सावंत, रामपूरचे वनरक्षक राहुल गुंठे, वाहन चालक नंदकुमार कदम, प्रणित कलकुटकी आणि अजय बडदे यांनी फणसवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत शिताफीने या मगरीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. पकडलेली मगर सुमारे ८ ते ८.५ फूट लांबीची असून ती पूर्ण वाढ झालेली होती.

या मगरीची वैद्यकीय तपासणी करून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हे संपूर्ण बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. लोकवस्तीत शिरलेल्या मगरीला वनविभागाने वेळेत जेरबंद केल्यामुळे कापसाळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Total Visitor Counter

3485557
Share This Article