GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणातील अपघातप्रकरणी राष्ट्रवादीचे जयंद्रथ खताते यांच्या मुलावर गुन्हा

इनोव्हा कारने ठोकरून पादचारी ठार

चिपळूण : शहरातील काविळतळी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत पादचारी प्रौढ ठार झाला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात रमेश बंडू कलकुटकी (वय ५०, रा. गांधी नगर – बहादूरशेखनाका) हे ठार झाले. तर, अभिजित जयंद्रथ खताते (वय ३५, रा. खेर्डी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे.

अभिजित हा राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी जयंद्रथ खताते यांचा मुलगा आहे. तो इनोव्हा कारने खेर्डीकडे जात असताना काविळतळी येथे रस्त्यावरून जात असलेल्या कलकुटकी यांना जोरदार धडक बसली. या धडकेत कलकुटकी यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे बहादूरशेखनाका परिसरात मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर कलकुटकी यांचा मृतदेह कामथे रुग्णालयात नेण्यात आला. तेथून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि अधिक तपासासाठी कारवाई सुरू झाली.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अभिजित खताते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जयंद्रथ खताते यांच्या मालकीच्या डंपरने खेर्डी येथे एका दुचाकीला धडक दिली होती. त्या अपघातात दुचाकीवरील विवाहिता महिला ठार झाली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या दुसऱ्या वाहनाचा हा दुसरा अपघात घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Total Visitor Counter

2455607
Share This Article