मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. विक्रांत जाधव हे माजी मंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र असून जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसून येत असून आम. जाधव यांनीही आनंद प्रकट केला
ठाकरे गटाच्या शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव
