रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील पोस्ट ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.15 वाजता ते 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने पोस्ट ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ट्रेझरी रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चोरट्यांना काहीही चोरी करण्यात यश आले नाही.
या प्रकरणी उपडाकपाल सौ. मृण्मयी महेश महामुनी (वय 53, रा. वैभव को.ऑप. हौसिंग सोसायटी, उत्कर्षनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा क्र. 157/2025 भा.न्याय.अ. 2023 चे कलम 331(4), 62 प्रमाणे दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
कोतवडे पोस्ट ऑफिसमध्ये अज्ञात चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न
