रत्नागिरी : आगरनरळ जिल्हा परिषद शाळेला दर्जेदार पुस्तकांची भेट

Gramin Varta
34 Views

रत्नागिरी: आगरनरळ प्रकर्ष लोकसेवा फाउंडेशनतर्फे आगरनरळ (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयासाठी दर्जेदार वाचन पुस्तकांची भेट देण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी ज्ञानाची कास धरावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर लवंदे, उपाध्यक्ष अक्षय मेस्त्री यांच्या सह आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदेश महाकाळ आदींसह सहकारी शिक्षक/शिक्षिका उपस्थित होत्या.

आगरनरळ प्रकर्ष लोकसेवा फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी केलेले हे पुस्तकदान अत्यंत प्रेरणादायी असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल. या अमूल्य ज्ञानभेटीबद्दल शाळेतर्फे फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. पुस्तक हेच खरे ज्ञानाचे दार आहे आणि ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, हे लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आगरनरळ प्रकर्ष लोकसेवा फाउंडेशनने राबविलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

Total Visitors :
4685170
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *