GRAMIN SEARCH BANNER

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे अभियंता दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
54 Views

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

सर एम विश्वेश्वरय्या हे भारतातील महान अभियंता होते ज्यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला. त्यांना अभियांत्रिकीचे जनक देखील म्हंटले जाते. अभियंता दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि तरुणांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये करियर करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी सर एम विश्र्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या जीवनातील कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

अभियंता दिनाचे औचित्य साधून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील अभियंते श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. अभिजित पाटील, आणि तांत्रिक सहाय्यक  श्री. सुरेश हातागळे, विद्युत सहाय्यक श्री. संदेश चव्हाण यांचा मा. प्राचार्य यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले आणि जयंती साजरी करण्यात उत्साहपूर्ण सहभाग दर्शवला.

Total Visitor Counter

2647798
Share This Article