GRAMIN SEARCH BANNER

कस्टम्स ऑफिस येथे ‘पॉश कायदा’ विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कस्टम्स कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ (संरक्षण प्रतिबंध व निवारण) कायदा २०१२ यावर साक्षरता शिबीर संपन्न झाले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील व बाल न्याय मंडळाच्या सदस्य विनया घाग, कस्टम्स कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप कृष्ण हे उपस्थित होते
श्रीमती घाग यांनी कार्यालयामध्ये महिला सहकाऱ्यांशी वागताना पुरूष कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. पॉश कायद्याच्या सविस्तर तरतुदीबाबत श्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Total Visitor Counter

2475126
Share This Article