GRAMIN SEARCH BANNER

सैतवडे उपकेंद्रात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ विशेष आरोग्य शिबिर

Gramin Varta
415 Views

रत्नागिरी : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष अभियानांतर्गत 26 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद अंतर्गत उपकेंद्र सैतवडे येथे महिला व बालकांसाठी सर्वसमावेशक आरोग्य शिबिर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांच्या हस्ते झाले. या वेळी सत्कोंडी सरपंच सतीश थूल आणि गुंबद सरपंच उषा सावंत उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती कदम यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविकात डॉ. कदम यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले.

या शिबिरात महिलांमध्ये आरोग्य जनजागृतीसह सविस्तर तपासण्या व समुपदेशन करण्यात आले.

◼️उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी

◼️क्षयरोग, ॲनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग

◼️गरोदर मातांचे समुपदेशन व लसीकरण

◼️मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन

◼️किशोरवयीन मुलींसाठी विशेष समुपदेशन

योगा सत्र, पूरक आहार आणि आरोग्यदायी आहाराविषयी माहिती
तसेच आयुष्यमान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्डसाठी ई-केवायसीचीही सुविधा देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. भाग्यश्री कावरे, आरोग्य सहाय्यक श्री. तांबे, आरोग्य सहायिका संकिता पारकर, समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी, माधुरी सावंत, मयुरी रहाटे, आरोग्य सेविका पूनम वासावे, पूनम लाड, सोनाली डांगे, आरोग्य सेवक मोरे, बोके, वाहन चालक दादा दुदवाडकर, टेलिमेडिसिनची जबाबदारी लावण्या गोरे आणि सिद्धी प्रसादे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

आशा गटप्रवर्तक गोताड मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षक केतकर मॅडम, मुख्याध्यापिका लांजेकर मॅडम, जाधव मॅडम, मुख्याध्यापक अंतुले सर, स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे महिलांचे आरोग्य संवर्धन आणि कुटुंब सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.

Total Visitor Counter

2647924
Share This Article