मंडणगड (प्रतिनिधी) – तालुक्यातील लाटवण येथे बांधकाम ठेकेदार म्हणून काम करणारे मूळचे झारखंडचे रहिवासी खुदन नेमन मेहता (वय ७३) हे सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची तक्रार त्यांच्या मुलाने मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खुदन मेहता हे सोमवारी सकाळी लाटवण येथील भाऊ कैलास मेहता यांच्या घरातून प्लास्टरच्या कामासाठी जातो, असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, नेहमीच्या वेळेत ते परत न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर त्यांचा मुलगा उमेश खुदन मेहता यांनी बुधवारी मंडणगड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून, खुदन मेहता यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.