GRAMIN SEARCH BANNER

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दोन अपघातात ‌दोन ठार, तीन जखमी

रायगड : जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर टोल नाक्याजवळ टँकरची धडक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रेलरला बसल्याने अपघात झाला या दुर्घटनेत  टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अपघात याच मार्गावर असलेल्या भाताड बोगद्यानजीत घडला, दुसऱ्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
  
मुंबई पुणे एक्सप्रेस वेळेवर मंगळवारी पहाटे एलपीजी गॅस टँकरने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या टेलरला आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा अपघात झाला या अपघातामध्ये गॅस टँकर च्या चालक सुनील तांबरे याचा जागीच मृत्यू झाला टँकरमध्ये एलपीजी गॅस असल्याने त्याची माहिती तात्काळ केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना देण्यात आली. श्री गिध त्वरित घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी टँकरची तपासणी केली व गॅस लिकेज नसल्याने मोठी दुर्घटना घडली असल्याचे सांगितले.

त्याचवेळी दुसरा अपघात मंगळवारी पहाटे भातांड बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसला पिकप टेम्पो ने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तीन गंभीर जखमी झाले की माहिती खोपोली पोलिसांकडून देण्यात आली.

या अपघाताची माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेस वरून खाजगी बस चालक विश्वजीत अरुण देसाई (३०) रा. पाटण, जिल्हा सातारा हा पाटण ते मुंबईकडे प्रवासी बस घेऊन जात असताना भातांड बोगद्याजवळ एक पादचारी  समोर आला असता त्याला वाचवण्यासाठी बस चालक प्रयत्न करीत असताना बस रस्त्याच्या कडेला जोराने धडकली व बसचे टायर फुटल्याने  अपघात घडला. सदर बसचे टायर बदलत असताना बसच्या क्लिनर आणि प्रवासी पिंटू पवार हे बसच्या मागे टायर बदलण्यासाठी उभे असताना त्याच वेळी पिकप टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बसला जोराने धडक दिली या अपघातामध्ये प्रवासी पिंटू पवार (४५) रा.पाटण,जि. सातारा याचा जागीच मृत्यू झाला, बस चालक, क्लीनर आणि टेम्पो चालत गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ पनवेल येथील एमजीएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने आय आर बी च्या पथकाने रस्त्यावरून दूर करण्यात आली.

Total Visitor

0201305
Share This Article
Leave a Comment