GRAMIN SEARCH BANNER

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे रक्तदान शिबिरात ७० रक्तपिशव्यांचे संकलन

रत्नागिरी : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेल्या तीव्र रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनतर्फे फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज, एमआयडीसी, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अल्प कालावधीत नियोजन करून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण ७० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी पथकाने या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य मिलिंद यादव तसेच कार्यक्रम समन्वयक उमेश सामंत यांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या उपक्रमास रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना संदीप करे, रोटे. दादा कदम, रोटे. सिताराम सावंत तसेच कार्यक्रम प्रमुख रोटे. वामन सावंत उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने सामाजिक बांधिलकी जपत तातडीच्या गरजेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील रक्तसाठा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक विभागाने देखील विशेष कौतुक केले आहे.

Total Visitor Counter

3403915
Share This Article