GRAMIN SEARCH BANNER

देवखेळ वेबसिरीजचे आक्षेपाहार्य चित्रणाला लागणार कात्री ; झी ५ चे आश्वासन

मुंबई/ उदय दणदणे : ऐन शिमगोत्सवात झी ५ मराठी ओटीटीवर प्रसारित झालेली “देवखेळ” वेबसिरीज मधून कोकणातील लोकसंस्कृतीचे विद्रुपीकरण व कोकणातील प्रामुख्याने गुहागर मध्ये जोपासलेली नमन-देवखेळे परंपरेतील अवघ्यांचे श्रद्धास्थान संकासूर दैवताला क्रूर,खुनी असल्याचे चित्रण प्रसारीत झाल्याने मोठया प्रमाणात जनभावना दुखावल्या आहेत.सदर बाबत संतापजनक परिस्थिती निर्माण झाली असून देवखेळ वेबसिरीजचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.सदर बाबत नमन लोककला संस्था तालुका गुहागर शाखेच्या वतीने ठोस पावले उचलत स्थानिक प्रशासन ते लोकप्रतिनिधी तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे “देवखेळ” वेबसिरीज वर तातडीने बंदी आणण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. परंतु नमन मंडळ, देवखेळे व स्थानिक जनतेच्या निषेधाची तीव्रता लक्षात घेत “नमन लोककला संस्था तालुका गुहागर” शाखेच्या कार्यकारणीने गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील झी ५ कार्यालयामध्ये जाऊन प्रोग्रामिंग टीमचे हेड अजिंक्य गोखले यांची भेट घेऊन “देवखेळ” वेबसिरीज तातडीने बंद करण्याचे निवेदन देत गुहागरमधील तीव्र निषेधाची व संतापजनक परिस्थितीची निवेदनाद्वारे जाणीव करुन देण्यात आली आहे.यावर खुलासा करताना झी ५ प्रोग्रामिंग टीमचे हेड अजिंक्य गोखले यांनी सांगितले की, सदर वेबसिरीजचे फक्त सातच भाग प्रसारित होणार असून सद्यस्थितीत संकासुर निषेधाचा गुहागर वासियांचा रोष पाहता व निषेधप्रती निवेदनांवर झी ५ ने आलेल्या सूचनांची तात्काळ दखल घेऊन त्यात योग्य ते बदल केल्याचा दावा बोलून दाखविला. तसेच एपिसोड वाईज घेण्यात आलेल्या हरकती बाबतचे “अस्वीकरण”(disclaimer) वेबसिरीजच्या प्रत्येक भागात सोडण्यात आल्याचे कळविले. तसेच अजूनही काही आक्षेपाहार्य आढळल्यास त्याचेही निराकारण करण्याचे आश्वासन दिले. यावर नमन लोककला संस्था तालुका गुहागर कार्यकारणीने झी ५ चे संबधित व्यवस्थापन व देवखेळ वेबसिरीजचे लेखक,दिग्दर्शक त्यांच्या संबधितांबरोबर आम्हा न.लो. संस्था तालुका शाखा कार्यकारणी व नमन लोककलेतील जाणकर मंडळी, अभ्यासक असे आमच्या शिष्ट मंडळाबरोबर तातडीने मिटिंगचे आयोजन करण्याचे बजावले असून त्यास झी ५ चे प्रतिनिधी अजिंक्य गोखले यांनी होकार दर्शवला असून याबाबत लवकरच न. लो. संस्था संलग्न गुहागर शाखा कार्यकारणीच्या वतीने झी ५ कार्यालयाकडे मिटींगची तारीख कळविण्यात येणार असल्याचे न. लो. संस्था तालुका गुहागर शाखेच्या वतीने झी ५ ला सांगण्यात आले आहे, झी ५ चे प्रतिनिधी अजिंक्य गोखले यांनी सदर मागणीला सहमती दर्शवली आहे.सदर महत्वपूर्ण भेटीला न. लो. संस्था तालुका गुहागर शाखेचे सचिव संदिप कानसे,खजिनदार/प्रसिद्धी प्रमुख उदय दणदणे, सदस्य दिपक वेलुंडे अमित काताळे आदी पदाधिकरी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485115
Share This Article