GRAMIN SEARCH BANNER

सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसमध्ये वृद्धेचे दागिने लंपास; एक जेरबंद, साथीदार फरार

Gramin Varta
102 Views

खेड:कोकण मार्गावरील सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास करणारा अभिजित जितू पवार (२७, रा. अंबरनाथ, ठाणे) याला रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या प्रकरणात त्याचा साथीदार नीलेश गायकवाड (रा. भवानी परिसर, अंबरनाथ) याचाही सहभाग असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे.

रंजना वामन पालांडे या वृद्ध महिलेच्या हातातील तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी आरोपीने चलाखीने लंपास केली होती. नाळ लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी माहितीच्या आधारे अभिजित पवारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, नीलेश गायकवाडच्या मदतीने दागिने चोरल्याचेही सांगितले. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3377196
Share This Article