GRAMIN SEARCH BANNER

कै. बाबुराव जोशी गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

रत्नागिरी : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशालेतील कै. बाबुराव जोशी गुरूकुल प्रकल्प विभागातील  विद्यार्थिनी कु. अनन्या अमित जोशी हिने इयत्ता पाचवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १०९ वा क्रमांक पटकावला. तर इयत्ता आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत कु. आर्या विक्रम जोशी हिने १३वा, कु. देवांशी आशिष चौघुले हिने २२वा व कु. स्वराली गणेश कुलकर्णी हिने ९६वा क्रमांक  पटकावला.  त्यांना प्रशालेतील शिक्षक श्री. वासुदेव परांजपे, श्री. अमोल पाष्टे, श्रीम. शर्वरी कशेळकर, सौ. अश्विनी तांबे, श्रीम. श्रद्धा टिकेकर, श्री. केदार मुळ्ये, श्रीम. गौरी भटसाळसकर, सौ. श्रीदा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ.अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले.

Total Visitor Counter

2475258
Share This Article