रत्नागिरी: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूटतर्फे नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेचे आयोजन आज संस्थेच्या रत्नागिरीतील कार्यालयात करण्यात आले.कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेत विविध वयोगटातील सहभागींनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांना उपवासाच्या वेळी तयार करता येणाऱ्या पौष्टिक व स्वादिष्ट ९ पदार्थ शिकवण्यात आले. यामध्ये उपवासाची चटणी, उपवासाचे पोटॅटो ट्रँगल, उपवासाचे पोटॅटो पॉपकॉर्न, उपवासाचे पोटॅटो स्किन फ्राईज, उपवासाची इडली, साबुदाणा सँडविच/पॅटीस, उपवासाचे पोटॅटो आम्लेट, पोटॅटो बटाटा मिक्स भाजी, उपवासाचे फ्रेंच फ्राईज अशा अनेक पारंपरिक पदार्थ शिकवण्यात आले.पाककला तज्ज्ञांनी खास टिप्स व ट्रिक्स दिल्या. त्यामुळे सहभागी आपल्याला घरीही हे पदार्थ सहज बनवू शकतील. पाककला तज्ज्ञांनी उपवासाच्या पदार्थांची योग्य निवड आणि ते बनवताना आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांची माहिती दिली.
कार्यशाळेतील सहभागींनी आपले अनुभव व्यक्त करताना म्हटले की, या कार्यशाळेत सहभागी होणे खूपच उत्तम अनुभव होता. नुसते पारंपरिक पदार्थ नाही तर काही नवा आणि अनोखा पदार्थ शिकून आम्ही घरच्यांसाठी त्याची तयारी केली आहे. यामुळे नवरात्री साजरी करत असताना आमच्या आहारात अधिक विविधता आली.या कार्यशाळेला बाया कर्वेचे ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटीलिटीचे प्रशिक्षक प्रसाद शेवडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप उत्साही आणि आनंदी वातावरणात झाला. बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूटने या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल शंभर टक्के यश मिळवले असून, त्यांचा हा उपक्रम नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल.आपण सर्वांनी नवरात्रीच्या पवित्र दिवशी आपली पाककला कौशल्ये विकसित केली. या कार्यशाळेने आपल्याला पारंपरिक पदार्थासोबतच नवा दृष्टिकोनदेखील दिला आहे, अशी भावना सहभागींनी व्यक्त केली.
रत्नागिरी : नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
