GRAMIN SEARCH BANNER

पेण दूरशेत गावात रास्ता रोको सुरु, ओव्हरलोड डंपर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी

पेण: वारंवार प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही अवजड वाहतूक थांबायचं नाव घेत नाही. म्हणून आज पेण दूरशेत गावात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत.

ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील गेले कित्येक वर्ष सहल करावा लागतोय याचे कारण म्हणजे गावाच्या शेजारी असणाऱ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड, खडी यांनी दुर शेत रस्त्यावरून नेला जातो आणि यामुळे गावात रस्त्यांची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे. त्याच कारणामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला. शाळकरी मुलं असतील व भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील कंपनीमध्ये काम असतील त्यांना सगळ्यांना या गोष्टीचा दिवस रात्र त्रास सहन करावा लागत आहे .

आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. ह्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे झाले आहेत. असे सांगत स्थानिकांनी खाली डोके वर पाय ह्या सरकारचे करायचे काय? घोषणा देत रस्ता रोको केले आहे.

Total Visitor Counter

2455622
Share This Article