GRAMIN SEARCH BANNER

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Gramin Varta
10 Views

मुंबई: मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्रालयात दिंडोरी व पेठ तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीच्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच दिंडोरी व चंदनपुरी येथील मत्स्य व्यावसायिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, यावर योजना राबवण्यासोबतच विभागाचा भर मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक सामर्थ्य वाढविणे आहे. विभागाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

शर्व ईंनटरप्राईजेचे समीर पोतनीस यांनी बोटींची धडक टाळण्यासाठी भारतीय बनावटीचे शर्व एआयएस यंत्र बोटीवर बसविण्यासंदर्भात सादरीकरण केले.

Total Visitor Counter

2647809
Share This Article