GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा परिषदेच्या 470 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पूर्ण

Gramin Varta
79 Views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बदली प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सहा संवर्गांतील एकूण 470 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात येऊन त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, हे शिक्षक सोमवारपासून आपापल्या नवीन शाळांमध्ये हजर होऊ लागले आहेत. या टप्प्यानंतर सातव्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्गही खुला झाला आहे.

◼️जिल्हा परिषदेने बदली प्रक्रिया विविध संवर्गानुसार राबवली.

◼️संवर्ग 1: दिव्यांग, गंभीर आजारग्रस्त, अपंग, विधवा आणि 53 वर्षांवरील शिक्षक.

◼️संवर्ग 2: पती–पत्नी एकत्रीकरणासाठी पात्र असलेले शिक्षक.

◼️संवर्ग 3: अवघड क्षेत्रातील शाळांसाठी पात्र शिक्षक (2022 मधील अवघड क्षेत्र यादी प्रमाणभूत).

◼️संवर्ग 4: एकाच शाळेत 5 वर्षे किंवा अवघड क्षेत्रात 10 वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक.

या प्रक्रियेला काही शिक्षकांनी विरोध दर्शवून न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे काही काळ बदली प्रक्रिया स्थगित राहिली होती. मात्र स्थगिती उठल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने सातव्या टप्प्यास सुरुवात केली आहे. या पुढील टप्प्यात, एकाच शाळेत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण न केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये बदली स्वीकारावी लागणार आहे.

Total Visitor Counter

2651782
Share This Article