GRAMIN SEARCH BANNER

उक्षी-करबुडे घाटात निष्काळजीपणे वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या टँकर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:  करबुडे ते उक्षी मार्गावरील जोशी फार्म हाऊसजवळ एका टैंकरचालकाने निष्काळजीपणे वाहन चालविल्याने रात्रीच्या सुमारास टैंकर उलटून मोठा अपघात झाला. या अपघातामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी टैंकरचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ९:१० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी सभ्रमनीयन मरगन (वय २६, रा. तामिळनाडू) हा आपल्या ताब्यातील टैंकर (क्र. टीएन ३० बीपी ९९६९) घेऊन रत्नागिरीहून मुंबईकडे जात होता. करबुडे ते उक्षी मार्गाने जात असताना जोशी फार्म हाऊसजवळ असलेल्या तीव्र वळणावर आणि उतारावर आरोपीने वाहनावरील नियंत्रण गमावले. यामुळे टैंकर रस्त्यातच अडकून पडले आणि वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे  सागर चंद्रकांत साळवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, टैंकर चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली होती. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.

या प्रकरणी, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ नुसार गु.आर.नं. १५१/२०२५ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Total Visitor Counter

2456107
Share This Article