मुंबई: अखेर महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न खरं झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एन्ट्री, एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाचवेळी एन्ट्री घेतली. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि मंचावरुन अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं.
वरळी डोमच्या आतमध्ये प्रंचड गर्दी झाली असून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याचीदेही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटला आहे. वरळी डोममध्ये मराठी अस्मितेसाठी हाडाचा मराठी माणूस एकत्र आला आहे. आज तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना असल्याचं अनेकांनी बोलताना सांगितलं आहे. तसेच, आज ठाकरे बंधू एकत्र येत नाहीयेत, तर मराठी बाणा एकत्र येतोय, अशीही प्रतिक्रिया जमलेल्या अनेकांनी दिली आहे.
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची मंचावर ग्रँड एन्ट्री; मराठी माणसाला हवीहवीशी भेट अखेर झालीच

Leave a Comment