संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून देण्यासाठी श्री. प्रवीण मादूस्कर व श्री. सुभाष मुळ्ये यांच्या पुढाकाराने ‘श्री रवळनाथ दूध संकलन केंद्राचा’ शुभारंभ करण्यात आला. गावातील दूध उत्पादकांसाठी हे केंद्र एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. नुपुरा मुळ्ये, माजी उपसरपंच श्री. राजेश आंबेकर, श्री. अनंत मुळ्ये आणि मनोज मोहिते यांनी या केंद्राला भेट देऊन प्रवीण मादूस्कर व सुभाष मुळ्ये यांच्या या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या केंद्राच्या माध्यमातून गावातील आर्थिक विकासालाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे श्री रवळनाथ दूध संकलन केंद्राचा शुभारंभ
