राजापूर: तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ, रोम्वेवाडी येथे बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह वाहळात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना १२ जून रोजी दुपारी ३ ते १६ जून २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेदरम्यान घडली.
यशवंत दत्ताराम रोग्ये (वय ५६, रा. हसोळ तर्फे सौंदळ, रोम्वेवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत यशवंत रोग्ये हे आपला चुलत भाऊ अर्जुन रोग्ये यांच्याकडे जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, त्यानंतर ते परत आलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि वाडीतील लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर, हसोळ तर्फे सौंदळ, रोग्येवाडी येथील वाहळात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजापूरमध्ये बेपत्ता वृद्धाचा मृतदेह वाहळात आढळला
