तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, तुळसवडे नं. 1 येथे शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थी ध्रुव प्रविण किंजळस्कर याने सिंधुरत्न टॅलेंट परीक्षा 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हा गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल तुळसवडे परिसरात आणि शाळेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे पार पडला. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते ध्रुव किंजळस्कर आणि त्याच्या पालकांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ध्रुवच्या या यशामागे त्याच्या शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. केंद्रप्रमुख प्रभाकर चव्हाण, केंद्रप्रमुख शिक्षक प्रविण किंजळस्कर (ध्रुवचे वडील), सहकारी शिक्षक प्रसाद दरडे व सुग्रीव मुंडे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनीही ध्रुवचे विशेष कौतुक करत त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ध्रुवच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचे नाव उजळले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्त्रोत ठरत आहे.