विनायक सावंत / सावर्डे : चिपळूण तालुक्यातील निकम फाउंडेशन, सावर्डे यांच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.
निसर्गाशी आपले ऋण असल्याची जाणीव ठेवत, ५० वेगवेगळ्या जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही फाउंडेशनतर्फे करण्यात आला.
कार्यक्रमावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुहासिनी निकम यांनी वडाच्या झाडाचे महत्त्व स्पष्ट करत, निसर्गातील समतोल राखण्यात वृक्षांचे मोलाचे योगदान कसे असते, याचे उदाहरणाद्वारे विवेचन केले.
यावेळी अध्यक्ष अमोल निकम यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी विनायक सावंत, आदिती निकम, सिद्धी सावंत, सौरभ धुमाळ, अमर सावंत, रविका सिस्टर, दिव्या धुमाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निकम फाउंडेशनतर्फे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवले जात असून, भविष्यातही असे उपक्रम हाती घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सावर्डे येथे कृषी दिनानिमित्त निकम फाउंडेशनतर्फे वृक्ष लागवड

Leave a Comment