सावर्डे (वार्ताहर) – चिपळूण तालुक्यातील सावर्डे लायन्स क्लब तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सावर्डे पोलीस स्टेशन तसेच महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमात लायन्स क्लबच्या सदस्या आदिती निकम आणि दर्शना पाटील यांनी ‘आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या भावांना’ राखी बांधून आपुलकी व्यक्त केली. यावेळी गिरीश कोकाटे, देवराज गरगटे, सतीश सावर्डेकर, राजेश कोकाटे, अरुण पाटील, विजय राजेशिर्के आदी उपस्थित होते.
पोलीस व महावितरण कर्मचाऱ्यांनी याचा मनःपूर्वक स्वीकार करून लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
सावर्डे लायन्स क्लब महिलांकडून पोलीस व महावितरण कर्मचाऱ्यांना राखीबंध
