GRAMIN SEARCH BANNER

खेड: रिव्हर्स घेताना कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

Gramin Varta
9 Views

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ एका इर्टीका कारने रिव्हर्स घेत असताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले असून, संबंधित कारचालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अतुल सुधीर ठाकुर (पो.हे.कॉ. चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल अशोक सुर्वे (वय ४५, रा. मानव मंदिर अपार्टमेंट, कळवा, ठाणे) हा आपल्या ताब्यातील इर्टीका कार (क्र. एम.एच.०४ एल.एम.३००१) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा दिशेने जात होता. यावेळी तो कामाक्षी पेट्रोल पंप पार केल्यानंतर सुमारे १०० मीटर रिव्हर्सने गाडी चालवत होता. या वेळी त्याने निष्काळजीपणे आणि हयगयीने रिव्हर्स घेतल्याने, पाठीमागून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्र. एम.एच.०६ सी.के.५२१६) ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नितेश नारायण जाधव (वय ४०) आणि त्यांची पत्नी प्रविणा नितेश जाधव (वय २९, दोघेही रा. धामणसही, ता. रोहा, जि. रायगड) हे दोघेही जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २० जुलै २०२५ रोजी रात्री ९.१३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2652220
Share This Article