GRAMIN SEARCH BANNER

नवोदित कलाकारांना नवचेतना मिळणार, रत्नागिरी तालुका धम्म क्रांती कला मंचाची स्थापना

Gramin Varta
8 Views

अध्यक्षपदी रविकांत पवार, सचिवपदी सतिश कदम

जाकादेवी/ संतोष पवार
       रत्नागिरी तालुक्यातील धम्मक्रांती कला मंच यांची रत्नागिरी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या धम्म क्रांती कला मंचाच्या अध्यक्षपदी मालगुंड येथील कवी -गायक रविकांत सोनू पवार यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी निवेंडी येथील संगीतकार सतिश भागुराम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे – कार्याध्यक्ष- मिलिंद महादेव कांबळे (विल्ये),  उपकार्याध्यक्ष प्रशांत श्रीधर मोहिते (जयगड ), उपाध्यक्ष अनंत गंगाराम जाधव( धामणसे), सुरेश गंगाराम कांबळे (पानवळ) ,उपचिटणीस प्रशांत गोपिनाथ जाधव (सडामिऱ्या), संदीप सोनू जाधव (वाटप पूर्व ),उमेश नामदेव मोहिते (रत्नागिरी) ,खजिनदार -गौतम सावंत (लाजूळ),तालुका संघटक – दीपक देमा पवार (पोमेंडी), किरण सिद्धार्थ सावंत (कोळीसरे ),श्री भिमराज मोहन जाधव (वरवडे ),रविंद्र कांबळे (पिरंदवणे), मनोज शिवराम जाधव (केळये) ,प्रमोद भिकाजी कांबळे( कशेळी ),अनिल लक्ष्मण आयरे( नेवरे ),संजय बाळू पवार( देऊड) ,सल्लागार म्हणून प्रकाश रामचंद्र पवार (कळझोंडी )विजय सावंत( लाजूळ), सुनिल गोपाळ कांबळे (कोतवडे ),वसंत अर्जुन जाधव( ओरी ),कृष्णा सखाराम जाधव (वाटप पूर्व ),तर प्रसिद्ध प्रमुख संतोष रामचंद्र पवार (जाकादेवी) ,वैभव भिकाजी पवार (मालगुंड ),किशोर रामचंद्र पवार (कळझोंडी),अमित अनंत जाधव( तरवळ ) अमित कांबळे ( विरार मुंबई)अशी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
        या  नुतन कमिटीचे  रत्नागिरी धम्मक्रांती कला मंच जिल्हाध्यक्ष मनोज जाधव, रत्नागिरीचे  नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रविकांत पवार यांनी अभिनंदन केले.
      जाकादेवी हायस्कूल येथे आयोजित धम्मक्रांती कला मंच सविचार सभेच्या प्रसंगी धम्मक्रांती कला मंचाचे जिल्हाध्यक्ष मनोज जाधव ,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते , शाहीर जनार्दन मोहिते, ज्येष्ठ कलाकार प्रकाश रा.पवार  तालुका अध्यक्ष रविकांत सोनू पवार यांसह अनेकांनी धम्मक्रांती कला मंचाच्या कार्यप्रणाली विषयीच्या  व्यापक संकल्पने संदर्भात आपले सकारात्मक विचार व्यक्त करून बहुमोल मार्गदर्शन केले.
          सभेसाठी रत्नागिरी तालुक्यातील खेडेपाड्यातील अनेक जुने-जाणते तसेच नवोदित कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सहविचार सभेला कलाकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जणूकाही मेळाव्याची स्वरूप प्राप्त झाले होते. उपस्थितांतून  कलेमध्ये अभिरूची असलेले. स्वप्निल जाधव ,नरेश जाधव, अनंत जाधव ,दीपक जाधव, प्रशांत मोहिते ,सुधीर जाधव ,जितेंद्र पवार ,राजेश , जनार्दन मोहिते, प्रकाश पवार यांनी अतिशय मौलिक विचार व्यक्त केले.
       यावेळी गायनातून सुधाकर जाधव (वाटद ) भिमराज जाधव (वरवडे)राजेंद्र मोहिते ,(वरवडे)कृष्णा जाधव, (वाटद) संजय कांबळे , (पानवळ) अशोक जाधव ,(चाफे)नरेश जाधव  (तरवळ) इत्यादी जलसा कलाकारांनी अतिशय बहारदार स्वरूपाची परिवर्तनवादी गीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
   सभेची सुरुवात भगवान गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . याप्रसंगी तालुका अध्यक्ष रविकांत पवार यांनी एकूणच कला मंचची ध्येय धोरणं आणि भविष्यातील वाटचाल सविस्तरपणे स्पष्ट केले.यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील अलीकडच्या काळात निधन झालेल्या महान व्यक्ती व  जिल्हा व तालुक्यातील जलसा कलाकारांचे स्मरण करून दिवंगतांना कला मंचातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत पवार (मालगुंड ) संतोष पवार (जाकादेवी )आशुतोष जाधव( करबुडे) दीपक पवार (पोमेंडी) सतिश कदम (निवेंडी) नितीन मोहिते (रत्नागिरी) प्रशांत जाधव (सडामिऱ्या) उमेश मोहिते (रत्नागिरी) मिलिंद कांबळे (विल्ये )शाम पवार (मालगुंड), अमित जाधव (तरवळ) प्रणित जाधव (मेढे )यांनी अधिक मेहनत घेतली.
      धम्मक्रांती कला मंचाचे माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील जलसा मंडळांना अधिक गतिमान करण्याचा संकल्प उपस्थित जलसाकार कलाकार व कला मंच यांनी केला आहे. या मंचाच्या माध्यमातून तालुक्यातील कवी, गायक, वादक, अभिनय, इ.कलाकारांना नवचैतन्य देण्यासाठी  मंचातर्फे कृती कार्यक्रम, कार्यशाळा, तालुका स्तरावर स्नेहमेळावा, गीत गायन स्पर्धा घेण्याचे घोषित करण्यात आले. तालुक्यातील कलाकार मंडळांची तसेच  गाववार वैयक्तिक कलाकारांची माहिती संकलित करण्याचे काम कला  मंचांनी हाती घेतले आहे. या कला मंचात युवक -युवतींसह  स्त्री-पुरूषांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा कलामंच कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत पवार ,सचिव सतिश कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  पत्रकार संतोष पवार यांनी केले तर आभार नितीन मोहिते यांनी मानले.

Total Visitor Counter

2647288
Share This Article